राजकारण
राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी; राज्य सरकारने काढला अध्यादेश
राज्यातील ऊस उत्पादक साखर कारखान्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यातील ऊस उत्पादक साखर कारखान्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. 30 एप्रिल 2024 पर्यंत शेतकऱ्यांचा ऊस परराज्यात देता येणार नाही. असा राज्य सरकारचा अध्यादेश काढला आहे. कमी पावसामुळे यंदा ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने परराज्यात ऊस निर्यातीला बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
यंदाचा राज्यातील ऊस गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालू रहावा यासाठी परराज्यात होणार्या ऊसाच्या निर्यातीवर बंधन घालणे आवश्यक आहे. असे अध्यादेशमध्ये म्हटले आहे.