Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार; जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार?

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार; जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

यातच महाविकास आघाडीच्या पक्षांना प्रत्येकी 85 जागांच्या वाटपाची घोषणा केली. मात्र अद्याप 6 जागांवरील तिढा कायम असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती मिळत असून आता बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com