रेल्वे अपघात रोखणारे बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले?    थोरांतचा रेल्वेमंत्र्यांना सवाल

रेल्वे अपघात रोखणारे बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले? थोरांतचा रेल्वेमंत्र्यांना सवाल

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे.
Published on

मुंबई : ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे. अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपाघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. ओडीशा अपघातीची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

रेल्वे अपघात रोखणारे बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले?    थोरांतचा रेल्वेमंत्र्यांना सवाल
कोणाच्या खांद्यावर बंदूक चालवण्याचे काम नाही; पंकजा मुंडे आक्रमक, अमित शहांना भेटणार

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, १९५६ साली महबूबनगर रेल्वे अपघात झाला असताना तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहाद्दुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. आजचा अपघात भयंकर आहे, जिवित हानी प्रचंड झाली आहे, त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुळात रेल्वे मंत्री असतात कुठे हाच प्रश्न आहे. देशात कुठेही रेल्वेला हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर पंतप्रधानाच असतात. ओडीशातील रेल्वे अपतात अत्यंत भयानक व दुःखद आहे. याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.

दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशीही घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com