बीड मतदारसंघातून बजरंग सोनावणे 7 हजार मतांनी विजय, तर पंकजा मुंडे पराभूत
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळाला. अशातच ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे व शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात अतिशय टफ फाईट झाली. फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे 7000 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
त्यांच्या विरोधात 2014 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे हे विजयी होऊन खासदार झाले होते. त्यांना एकूण ६,३५,९९५ मते मिळाली होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांना ४,९९,५४१ मते मिळाली होती. त्यांचा १,३६,४५४ मतांनी पराभव झाला होता.