अजित दादांच्या अर्थमंत्रीपदावरून बच्चू कडूंची सकाळी नाराजी, दुपारी घुमजाव
नागपूर :अजितदादांच्या एन्ट्रीने मी नाराज नाही, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी सकाळी केले, तर दुपारी घुमजाव केला.अजितदादांच्या अर्थमंत्रीपदावरुन बच्चू कडूंनी भूमिका काही तासांतच बदलली.
काय म्हणाले बच्चू कडू
अजितदादांच्या एन्ट्रीने मी नाराज नाही
राजकारणात अनेकदा पेच होत असतो
दादा आले तर दादागिरीने सरकार चालेल
तीन इंजिनमुळे सरकार जास्त मजबूत
तीन तिगाडा होऊ नये अशी काळजी घ्यायला हवी
दिल्लीतील नेते यातून मार्ग काढणार
अजितदादांकडे अर्थखाते आलं तर चांगलंच
अधिक तेढ निर्माण होऊ नये दादांनी काळजी घ्यावी
अचानक वादळ सत्तेत घुसलंय
आता सत्ता एके सत्तेचा फळा पाहायला मिळतोय
आता सगळेच बेरजेचं राजकारण करतात
मी कार्यकर्त्यांची बैठक लावलेली आहे, त्यामुळे मी परत आलेलो आहे. मुंबईत राहिलो तर मंत्रीपद मिळतं असं नाही आहे. अजितदादा पवार यांना अर्थमंत्री पद मिळावं, अशी आमची इच्छा नाही आहे. कारण मागच्या वेळेस त्यांनी जे केलं, त्यामुळे त्यांना अर्थमंत्रीपद मिळू नये अशी आमची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांची रात्री काल बैठक झाली, बैठका आता होणारच आहेत, काम करत असाल तर बैठका घ्याव्या लागतात, असे बच्चू कडू म्हणाले.