राजेश टोपेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; लोणीकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
नागपूर : आमदार राजेश टोपे आणि आमदार बबनराव लोणीकर यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये लोणीकरांनी टोपेंना शिवीगाळ केली. यावर आता बबनराव लोणीकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही क्लिप माझी नाही ही खोटी आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. शंभर टक्के माझा आणि त्यांचा काही बोलणं झालेलं नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
बबनराव लोणीकर बाईट म्हणाले की, ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली. माझ्या बंगल्यावर सहा तास मीटिंग झाली आणि बिनविरोध निवडणूक केली. आता निवडणूक घेऊन 15 दिवस झाले ही क्लिप माझी नाही ही खोटी आहे. शंभर टक्के माझा आणि त्यांचा काही बोलणं झालेलं नाही.
तुम्ही शंभर वेळा विचारलं तरीही उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. माझं त्यांचं कुठलेही फोनवर संभाषण झालेलं नाही. मी सकाळपासून सभागृहामध्ये आहे. त्यामुळे मी ही क्लिप पाहिलेली नाही. उद्या ते आणि मी या सगळ्याला उत्तर देऊ. कायदेशीर तज्ज्ञांशी बोलून पुढची भूमिका घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवेळी राडा झाला होता आणि यावेळी लोणीकरच्या कार्यकर्त्यांनी टोपेंची गाडी फोडली होती. उपसभापती करण्यासंदर्भात वाद होता. लोणीकर गटाला उपसभापती करण्याचे टोपेंनी शब्द दिला होता. मात्र, दानवे गटाला उपसभापती पद गेल्याने लोणीकर यांनी संतापून शिवीगाळ केली असल्याची चर्चा आहे.