राजकारण
राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' दोन जिल्ह्यांची नावे बदलली
मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवण्यात आले होते. आता मात्र राज्य सरकारने मोठा निर्णय दिला आहे.
औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावंही बदललं आहे. आता शहरानंतर जिल्ह्याचं नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्याचंही नाव धाराशिव करण्यात आले आहे.
राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांच्या सहीने राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे.