भातखळकरांचा शिवसेनेला टोला; म्हणाले, हसरा मेळावा होणार....
राज्यात महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प निसटून गुजरातला गेल्यानंतर राज्यात जोरदार राजकीय घमासान सुरु असताना शिंदे गट- शिवसेनेचा आधीपासून सुरु असलेल्या दसरा मेळाव्याच्या वादात भाजप आमदार अतुल भातखळकरांनी उडी घेऊन वाद पुन्हा पुढे आणला आहे. भातखळकरांनी ट्विटद्वारे शिवसेनेला मेळाव्यावरून डिवचले आहे.
काय आहे भातखळकरांचे ट्विट ?
ट्विट मध्ये त्यांनी लिहले की, लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे? दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार? अशी टीका करत त्यांनी हास्यवर्धक ईमोजी सुद्धा टाकले आहेत.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर नक्की शिवसेना कोणाची हा वाद होत असताना वादासंबंधी निकाल आता कोर्टाच्या दरबारी आहे. हा वाद चालू असताना आता दसरा मेळाव्यावरून शिवसेनेत आणि शिंदे गटात रणकंदन सुरु आहे. इतर सर्वच पक्षांनी या वादात उडी घेतलेली आहे. भाजपकडून वारंवार सांगण्यात येत की, आमच्यासोबत जे आले आहेत ती खरी शिवसेना त्यामुळे दसरा मेळावा हे शिंदे गटाचाच होईल असे भाजप कडून ठामपणे सांगण्यात येतं आहे. यामूळे भातखळकरांच्या या ट्विटमुळे शिवसेना आणि भाजप संघर्ष पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.