सोलापुरातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
वसीम अत्तर, सोलापूर
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक भेटीगाठी पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.
दक्षिण सोलापुरात उमेदवारीसाठी भाजपमध्येच रस्सीखेच पाहायला मिळत असून आमदार सुभाष देशमुख यांना मतदारसंघातूनच तीव्र विरोध असल्याची माहिती मिळत आहे.
सुभाष देशमुख यांच्या नावाला पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असून स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सागर बंगला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपच्या माजी आठ नगरसेवक आणि सरपंचांनी मागणी केली आहे.
सोमनाथ वैद्य, सोलापूर भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनसिद्ध मुंगळे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.