शिवसेनेचा 2014 मध्येच सत्तास्थापनेचा प्रस्ताव, शिष्टमंडळात शिंदेंचाही समावेश; चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेचा 2014 मध्येच सत्तास्थापनेचा प्रस्ताव, शिष्टमंडळात शिंदेंचाही समावेश; चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री शिंदेंविषयी मोठा गौप्यस्फोट
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली. शिंदेंसह 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते. यानंतर भाजपसोबत शिंदेंनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या सर्व घडामोडींमध्ये शिंदे गटाने सातत्याने शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने बंडखोरी केल्याचे सांगत होती. परंतु, आता कॉंग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी मोठ गौप्यस्फोट केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी २०१४ मध्येच काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. जे प्रस्ताव घेऊन आले होते, त्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांचादेखील समावेळ होता. मात्र, त्यावेळी या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करा, हे मी त्यांना सांगितलं होते. परंतु, पुढे काय झाले हे मला माहित नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या खुलाशामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गट ज्या कारणासाठी शिवसेनेतून बाहेर पडले, आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर, यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com