अशोक चव्हाण फडणवीसांच्या भेटीला, काँग्रेसमध्येही होणार बंड; राजकारणात खळबळ
राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरू असताना दुसरीकडे गणेशोत्सवानिमित्त राजकीय मंडळींच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये बंड होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. त्याचे कारण असे की, मागील काही दिवसात काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी भाजपचा वरिष्ठ नेते मंडळींची भेट घेतली आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भेटीवर काय म्हणाले चव्हाण ?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चा रंगलेली असतानाच त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, अस त्यांनी बोलताना स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी नाराजीवर अशोक चव्हाणांनी दिल होत स्पष्टीकरण
राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ चालू असताना या सर्व गोंधळात काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण हे नाराज असल्याची चर्चा रंगली होत्या. मात्र चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हणाले होते की, मी नाराज नाही, काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं त्यांनी या आधीही सांगितलं होतं.
शिंदे सरकार मध्ये दोन काँग्रेस नेत्यांना मिळणार मंत्रीपद?
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सूचक विधान केले होते. या मंत्रिमंडळ विस्तारात वीस मंत्र्यांची वर्णी लागू शकते. यासाठी आमदारांनी तयारी करण्यास सुरुवात केले आहे. परंतु, अशातच शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस गटातील दोन माजी मंत्र्यांचा समावेश होण्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.