Ashish Shelar : रशेष शाह यांचा बोलविता "धनी" कोण?
मुंबई - कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूची सरकार चौकशी करणार तेव्हा रशेष शाह यांचा बोलविता "धनी" कोण? याही मुद्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज केली. एका मराठी माणसाने मोठया धाडसाने बाजारत उपलब्ध असलेल्या सुविधेतून कायदेशीर प्रक्रिया करुन कर्ज घेतले पण योग्य कायदयाचा गैरवापर करुन नितीन देसाई यांना अडचणीत आणण्यात आले का ?
रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीची ज्या पध्दतीचा रेकॉड आहे त्याची कालपर्यंत आपल्याकडे दोन प्रकरणे आली होती आता अजून काही प्रकरणे येऊ लागली आहेत आता या कंपनीची चार प्रकरणे आपल्याकडे आली आहेत त्यामध्ये या कंपनीने योग्य कायदयाचा अयोग्य वापर करुन खाजगी सावकारी थाटली आहे त्यामुळे या प्रकरणात रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीचा हेतू काय होता?
एका मराठी माणसाने उभा केलेला स्टुडिओ व त्याचा उदयोग गिळंकृत करण्याचा हेतू होता का?याची चौकशी करण्यात यावी हा स्टुडिओ रशेष शहाकडून अन्य कोणी विकत घेणार होता का?त्या ग्राहकाच्या सांगण्यावरुनच नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता का ? रशेष शाह यांचा बोलविता "धनी" कोण? या सगळयाची चौकशी झाली पाहिजे याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी करताना या प्रकरणाचा आपण पाठपुरवा करणार असल्याचे आमदार ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.