मुंबईत एकच चर्चा, धारावीतून निकाल लेंगे मातोश्री 2 चा खर्चा? भाजप नेत्याची टीका

मुंबईत एकच चर्चा, धारावीतून निकाल लेंगे मातोश्री 2 चा खर्चा? भाजप नेत्याची टीका

धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून अदानींविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरेंनी केली आहे. यावर आता आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Published on

मुंबई : मुंबई आंदण देणार नाही, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार आणि विकासक अदानी समूह यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरेंनी केली आहे. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईच्या विकासात आडवी येणारी उबाठा धारावी विकासाच्या आड आलीच, असा टोला शेलारांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

मुंबईत एकच चर्चा, धारावीतून निकाल लेंगे मातोश्री 2 चा खर्चा? भाजप नेत्याची टीका
शिंदे समर्थकांना धमकावून सरकार पाडलं, 50 घ्या नाहीतर...; कोणी केला दावा?

आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईच्या विकासात आडवी येणारी उबाठा धारावी विकासाच्या आड आलीच. मेट्रो आली तेव्हा आरेचा मुद्दा काढला. कोस्टल रोड आला तेव्हा सुध्दा अशीच खोटी माहिती पसरवली. उद्देश एकच विकास प्रकल्प लटकवणे आणि चोख कटकमिशन खाणे, अशी टीका त्यांनी केली आहे.

तसेच अडवणूक, आंदोलन, कधी मोर्चा. मुंबईत मात्र उबाठाबाबत एकच चर्चा धारावीतून निकाल लेंगे मातोश्री 2 चा खर्चा? असा हल्लाबोलही शेलारांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

धारावीचा विकास झाला पाहिजे. धारावीवाल्यांना 500 फुटापर्यंत घरे दिले पाहिजे. आतापर्यंत फक्त 500 झोपड्या सांगितल्या पण बाकीच्यांची नोंद नाही. पण, याठिकाणी अदानी हे फसवणूक करत आहेत. अदानी यांना टेंडर दिलेले आहे. हा विषय आता मुंबईचा विषय आहे. पिढ्यानं पिढ्या असलेल्या घरांना जागा मिळाली पाहिजे त्यात गिरणी कामगार आणि बाकीचे प्रकल्पग्रस्त यांनाही जागा मिळाली पाहिजे. तिथे निर्माण होणारा टीडीआर हा धारावीसाठीच वापरला पाहिजे. जर घोळ झाला तर ह्या ठिकाणी जबाबदार ती कंपनी राहणार का आणि त्या ठिकाणी त्यांना तुरुंगात टाकणार का? जर तुम्ही हे विषय विचारणार नाही किंवा घेणार नाही तर आम्ही शिवसेना म्हणून रस्त्यावर उतरू, असा इशारा उध्दव ठाकरेंनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com