सुरवातीला तीन दिवस झोप नव्हती, एकनाथ शिंदेंनी सांगितल्या विठूचरणी त्या आठवनी
eknath shinde speech : आज आषाढी एकादशीचा राज्यभर उत्साह आहे. आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 वाजून 10 मिनिटांनी ही पहिलीच महापूजा पार पडली. यानंतर त्यांनी बोलताना कोरोनामुळं दोन वर्षांनंतर वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. यंदा मोठा उत्साह असून 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले असल्याची माहिती, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. (ashadhi ekadashi 2022 cm eknath shinde speech reaction after pandharpur)
तसेच ते म्हणाले की, आम्ही जी भूमिका घेतली ती सत्तेसाठी नाही, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्यावर टीका झाली पण आम्ही त्याला टीकेतून नाही तर महाराष्ट्राला सुजलाम बनवून देऊ. माझ्या अधिवेशनातल्या भाषनाच मी सगळंच सांगितले नाही, पण वेळ आली तर सांगेन. तसेच आपण कोणत्याही धर्माला विरोध करणार नाही, सर्वांना सोबत घेऊन जाऊ. आता कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही. पंढरपुरचा आता इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे विकास केला जाईल, अस आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
विकास कामांचा आराखडा तयार नसेल तर तो तयार करा, कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही. तुम्हाला विश्वास आहे की आपल्यातलाच एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला आहे. बंडाच्या वेळी आमच्यावर अनेक आरोप झाले, पण एकही आमदार डगमगला नाही.