आरएसएसचा मुसलमानांना संपवण्याचा डाव;  ओवैसींचे टीकास्त्र

आरएसएसचा मुसलमानांना संपवण्याचा डाव; ओवैसींचे टीकास्त्र

मोदी सरकार देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी कडाडून विरोध केला आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : मोदी सरकार देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी कडाडून विरोध केला असून भाजप आणि आरएसएसवर टीकास्त्र डागले आहे.

आरएसएसचा मुसलमानांना संपवण्याचा डाव;  ओवैसींचे टीकास्त्र
अजित पवारांकडून परतलेल्या 'या' नेत्याला मोठी जबाबदारी

आरएसएसचे आधीपासून मुसलमान संपवण्याचे षड्यंत्र होते. देशात वारंवार खोटं पसरवले जातेय. समान नागरी कायद्याचा सगळ्यात जास्त त्रास हिंदूना होणारं आहे. आरएसएस जर मुल्लाला निशाणा बनवायचं म्हणत असेल तर यात दुसऱ्याचंही नुकसान होते. तुम्ही मराठी परिवारात भावाच्या मुलीसोबत बहिणीच्या मुलांचे लग्न बंद करणार का, असा सवाल असदुद्दीन ओवैसींनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतात की मुसलमानांना धडा शिकवायचा, मात्र त्याचा त्रास इतर लोकांना होतोय. जे मुसलमान मोदींचे ऐकतात त्यांना मी सरकारी मुसलमान म्हणणार. या सरकारी मुस्लिमांचा कार्यक्रम होणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हिंदू समाजात 84 टक्के बाल विवाह होतात. याबाबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी आदिवासी भागात जाऊन बोलावं. भारतातील सुंदरता संपवण्याचे काम केले जात आहे. आरएसएस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खोटं प्रेम दाखवतात, असे म्हणत नरेंद्र मोदी तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की मुस्लीम देशांचे, असा सवालही ओवैसींनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com