'अहंम ब्रम्हासी' अशी नार्वेकरांची भाषा; अरविंद सावंतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता आम्ही अंतिम संधी देत आहोत. ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करावं, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सुनावले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी नार्वेकरांवर घणाघात केला आहे.
दोन महिन्याच्या आत निर्णय घेतला पाहिजे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हंटले जाते. सुरेश प्रभू चीफ व्हीप आहेत तर मग निर्णय द्यायला इतका वेळ का? असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला आहे.
तुषार मेहता हे नवरात्रीचे कारण देऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटता येत नाही, असं हास्यास्पद कारण दिले आहे. मी इथला राजा आहे, अस राहुल नार्वेकर स्वतःला समजत आहेत. अहंकारी भाषा अध्यक्षांची माध्यमसमोर आहे. अहंम ब्रम्हासी अशी भाषा नार्वेकरांची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सातत्याने सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. सुप्रीम कोर्टाला माझी विनंती आहे. जितक्या तारखा द्याल तितका वेळ ही लोकं खातील. वेळकाढूपणा सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याइतकं बेकायदेशीर सरकार आतापर्यंत कोणी बघितलं नाहीये, असेही अरविंद सावंत म्हणाले आहेत.