Arjun Khotkar : अर्जुन खोतकरांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, शिंदे गटात जाण्याचा निर्णय
गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेले शिवसेनेचे मराठवाड्यातील मोठे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी अखेर आज शिवसेनेची (shiv sena) साथ सोडली आहे. अर्जून खोतकर यांनी अखेर एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाला पाठींबा जाहीर केला आहे. पत्रकार परिषदेतून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
गेल्या पाच दिवसांपासून अर्जुन खोतकर दिल्लीत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर काल शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी त्यांची मनधरणी केली. नंतर सत्तार, नवले आणि खोतकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ब्रेकफास्टही केला. यावेळी नवले आणि सत्तार यांनी खोतकर हे 31 जुलै रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आज खोतकर पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला आहे.