Kirit Somaiya Video: 'त्याने' केले अनेक महिलांचे सेक्सटॉर्शन; अनिल परब सभागृहात आक्रमक
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओमुळे अवघ्या देशभर खळबळ उडाली. याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. तर, सोमय्यांविरोधात अनिल परब चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
सोमय्यांच्या पत्रात कुठेही म्हंटलेलं नाही की तो व्हिडीओ खोटा आहे त्यांनी म्हंटले आहे की मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलंला नाही. म्हणजे याचा अर्थ तो व्हिडीओ खरा असल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केलंलं आहे, असे परबांनी म्हंटले आहे. तो व्हिडीओ खरा असेल तर त्या बाजूला कोण होतं. कोणी घेतला हा व्हिडीओ का घेतला? हे सगळं बाहेर आलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खालच्या सभागृहात खूप पेनड्राईव्ह बॉम्ब फुटले आज वरच्या सभागृहात आले आहे. एका माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोणाच्याही राजकीय आयुष्यात बदनामी काय असतं. राजकीय आयुष्य उध्दवस्त झाले तर राजकीय भाग असतो. परंतु, एक खासगी आयुष्य उद्धवस्त झालं तर ते कुटुंबावर येते. मुलाबाळांना यंत्रणेसमोर उभं केले जातं. हा सोमय्या, तुम्ही किंवा माझा प्रश्न नाही तर हा प्रश्न राजकीय जीवनात काम करणारा एकाचा आहे. कोणीही सहज येथे आलेले नाही. आंदोलनातून कार्यकर्ता वर येतो. परंतु, तुमच्या पूर्ण करिअरवर आघात होतो. त्यावेळेस बदनामी केली जातं, असे अनिल परब यांनी म्हंटले आहे.
हे सभागृह न्याय मिळण्यासाठीच आहे. काल ज्याचा व्हिडीओ रिलीज झाला त्यांच्यामुळे कित्येक जणांचे आयुष्य उद्धवस्त झालेले आहेत. यामुळे त्यांचे आयुष्य उध्दवस्त व्हावे अशी आमची इच्छा नाही. परंतु, या व्हिडीओची सत्यता बाहेर आलीच पाहिजे. यात महिला कोण हे समोर आले पाहिजे. आमच्याकडे जी माहिती आहे ती खरी-खोटी तपासून पाहा. गृहमंत्र्यांनी एसआयटी किंवा रॉ लावा. पण, तपास झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
तुमच्यासारखा उपमुख्यमंत्र्यांची राज्यात एक प्रतिमा आहे. अशा गोष्टी खपवून घेणार नाही,असे अनेक वेळा भाषणात ऐकले आहे. आज अशा एक प्रसंगाला सामोरे जावं लागतये. जी माहिती आहे. ही एक प्रकारची विकृती आहे. हे सेक्सटॉर्शन चालले असून अतिशय गंभीर आहे. याची चौकशी झालीच पाहिजं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सुधीर मुगंटीवार यांनी हात जोडून विनंती करतो तुमची नैतिकतेची भाषणे ऐकली आहेत. आज तुम्ही दाखवून द्या, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे. सीबीआय, ईडीसारखी भीती दाखवून तर कादचित हे प्रकार झाले नाही ना हे तपासा. पहिली सोमय्यांची सुरक्षा काढून घ्या याच्याच जोरावर हे प्रकार होत आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.