सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर...; अनिल परबांचे जाहीर आव्हान
मुंबई : दापोलीतील वादाच्या भोऱ्यात सापडलेलं साई रिसॉर्टवर आज तोडकामाची कारवाई होणार होती. यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे स्वतः दापोलीत पोहोचले होते. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तोडकामावर स्थगिती असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर टीकास्त्र सोडले आहे. सोमय्या यांच्यात हिम्मत असेल तर शिंदे गटातील नेत्यांवर बोलावे, असे जाहिर आव्हान त्यांनी दिले आहे.
अनिल परब म्हणाले की, गेले दोन दिवस बातम्या आहेत कि अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर हातोडा पडणार. पण, मी वारंवार सांगितलं कि रिसॉर्टची मालकी माजी नसून सदानंद परब यांची आहे. जाणून-बुजून मला त्रास देण्याचं काम सुरू आहे. सरकारमध्ये असताना सरकारला त्रास दिला जात होता. आता मला त्रास दिला जातोय. ज्यांच्यावर आरोप होते ते शिंदे गटात गेले. ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्याकडे हातोडा घेऊन सोमय्या जात नाहीत. जे शिंदे गटात गेले. त्यांच्यावर बोलण्याची हिंमत सोमय्या यांच्यात नाही. हिम्मत असेल तर त्यांच्यावर सोमया यांनी बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
ज्या यंत्रणांनी मला बोलवलं तिथं मी गेलो. माझं सहकार्य कायम राहील. परंतु, जाणून-बुजून किरीट सोमय्या यांच्याकडून मला बदनाम केल जातंय. त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल केलाय. आता फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. वारंवार माझ्याबद्दल बदनामी कारक वक्तव्य केली जात असून माझी बदनामी केली जात आहे. मी हजार वेळा सांगितलं आहे माझा रिसॉर्टचा संबंध नाही. कोर्टाच स्टेटमेंट सर्वांनीच वाचले पाहिजे. मी अजून देखील न्यायालयीन लढाई लढणार, असे त्यांनी म्हंटले आहे.
रिफायनरीबाबत बोलताना अनिल परब म्हणाले, शिवसेना लोकांबरोबर असेल. लोकांना प्रकल्प नको असेल तर आम्ही विरोधात असू. राजन साळवी हे स्थानिक आमदार आहेत. रिफायनरीबाबत दोन प्रकारचे मत प्रवाह आहेत. लोकांच म्हणणं ऐकून निर्णय घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.