माजी आमदार अनंतकुमार पाटलांचं वादग्रस्त विधान; गोपीचंद पडळकरांवर टीका करताना जीभ घसरली, म्हणाले...

माजी आमदार अनंतकुमार पाटलांचं वादग्रस्त विधान; गोपीचंद पडळकरांवर टीका करताना जीभ घसरली, म्हणाले...

माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गोपाल व्यास, वाशिम

माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना अनंतकुमार पाटील यांची जीभ घसरली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेनंतर माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर ही टीका केली आहे.

अनंतकुमार पाटील म्हणाले की, लोकनेते शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी खोटे आरोप करुन त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही निषेध करतो.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पडळकर हा फडणवीसांचा पाळीव कुत्रा आहे. फडणवीसांनी हे विरोधी पक्षावर भुंकण्यासाठी याला ठेवलेलं आहे. शरद पवार यांची ऊंची, कुठे शरद पवार आणि कुठे हा पडळकर. त्यांच्या जातीय संघर्ष या महाराष्ट्रात धनगर मराठा पेटवण्याचा हा त्याचा उद्देश आहे. असे अनंतकुमार पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com