Sandeepan Bhumre
Sandeepan BhumreTeam Lokshahi

नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला; मंत्री भुमरेंची ठाकरेंवर विखारी टीका

सत्तेवर असताना वेगवेगळ्या आजारांची कारणे देत कर्तव्यापासून पळ काढला
Published by :
Sagar Pradhan
Published on

सूरज दाहाट।अमरावती: रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे हे आज अमरावती दौऱ्यावर होते. शिवसेना हिंदुगर्व गर्जना संपर्क यात्रानिमित्त त्यांनी आज अमरावतीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.

Sandeepan Bhumre
शिवसेनेचे पाच आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, अब्दुल सत्तारांचा दावा

उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना घरातच बसून होते. कोरोनात ‘राजा घरी, जनता दारोदारी’ अशी स्थिती होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाताच, उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडताना जसे नवरीने माहेर सोडावं. तसा हा ईव्हेंट केला, अशी बोचरी टीका राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी केली आहे.

मुंबई येथे ५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक मंत्री राज्यभरात शिवसेना हिंदुगर्व गर्जना संपर्क यात्रा राबवित आहे. त्या अनुषंगाने शनिवारी अमरावतीत ना.संदिपान भुमरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.

Sandeepan Bhumre
तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके; आदित्य ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा डिवचले

पुढे ते बोलताना म्हणाले की, सत्तेवर असताना वेगवेगळ्या आजारांची कारणे देत कर्तव्यापासून पळ काढला. लोकांशी संपर्क ठेवला नाही. जणू शिवसेना संपली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने रामबाण इलाज करणारा डॉक्टर भेटल्याने आता सर्वांचा आजार बरा होईल, असा टोलाही ना.भुमरे यांनी ठाकरेंना लगावला, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले, याचा शोध घ्यावा. शिवसेनेचे आमदार, खासदार उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरतमार्गे गुवाहाटीचा मार्ग धरला. आता आम्ही समाधानी आहाेत. कारण मुख्यमंत्री शिंदे आमचा फोन उचलतात. त्यांना आम्ही थेट भेटू शकतो. जनतेची कामे करता येतात. असे विधान मंत्री भुमरे यांनी यावेळी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com