मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना केसीआर यांना हा प्रकार शोभतो का? मिटकरींचा सवाल

मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना केसीआर यांना हा प्रकार शोभतो का? मिटकरींचा सवाल

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर त्यांच्या ताफ्यासह पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. मात्र, उमरगा येथे केसीआर आणि त्यांच्या ताफ्याने नॉन व्हेजवर ताव मारला.
Published on

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर त्यांच्या ताफ्यासह पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. मात्र, उमरगा येथे केसीआर आणि त्यांच्या ताफ्याने नॉन व्हेजवर ताव मारला. जवळपास दीड हजार लोकांसाठी नॉन व्हेजची व्यवस्था करण्यात आली होती. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर निशाणा साधला आहे. पंढरी वारीवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? अशा शब्दात अमोल मिटकरींनी केसीआरवर घणाघात केला आहे.

मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना केसीआर यांना हा प्रकार शोभतो का? मिटकरींचा सवाल
बीआरएस भाजपची ‘बी’ टीम; नाना पटोलेंचे टीकास्त्र, तेलंगणा पॅटर्न फसवा

काय म्हणाले अमोल मिटकरी?

बीआरएसने नॉन व्हेज बेतावर अमोल मिटकरींनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडले आहे. मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा. पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका, असे अमोल मिटकरींनी म्हंटले आहे.

दरम्यान, पंढरपूरमध्ये आषाढीवारी होत आहे. या वारीत हैदराबादहून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ६०० गाड्यांचा ताफा घेऊन येत असल्याची माहिती समजते. पंढरपुरात आषाढी वारीला १० लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे बरोबर आहे का? पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नाही, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com