Amol Mitkari : अमोल मिटकरी अजित पवार यांच्या भेटीला; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी देवगिरीवर दाखल झाले आहेत. अमोल मिटकरींना अजित पवारांकडून बोलावणं आल्याची माहिती मिळत आहे. अमोल मिटकरींना अकोटमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले की, अकोला जिल्ह्यामध्ये एक दोन विधानसभा मतदारसंघ आम्ही मागण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये मी स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून अकोट विधानसभा मतदारसंघासाठी तयारी केलेली आहे. अकोला विधानसभा हा माझा तालुका आहे. त्याच्यामुळे मागे मी दादांकडे मागणी केलेली होती आणि मला असं वाटतं अंतिम यादी प्रसिद्ध होण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये अकोट विधानसभेचा उल्लेख नाही आणि म्हणूनच मी विनंती केली. एक सक्षम उमेदवार त्या ठिकाणी हवा. विदर्भामध्ये पण जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा लढल्या पाहिजे. कारण विदर्भातही ज्या पद्धतीने आता लाडकी बहिण योजना अजितदादांमुळे सगळीकडे गेली. त्याच्यामुळे एक विदर्भामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि विदर्भ हे बलस्थान आहे. मला अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की महायुतीमध्ये आमच्या पक्षाचा सकारात्मक विचार जिल्ह्यासाठी होणार. असे अमोल मिटकरी म्हणाले.