...आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत - अमित ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Raj Thackeray Son Amit Thackeray) यांनी अटी-शर्थींवरून थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिलं आहे.
तसेच राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असून पोलिसांनी घालून दिलेली आवाजाची मर्यादा पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, १ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत असे अमित ठाकरे यांनी निर्बंधांवरून पोलीस प्रशासनालाच आव्हान दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबाद (Aurangabad) औरंगाबाद सभेसाठी रवाना झाले. तसेच पुण्यातील राजमहल या निवास्थानी शंभर पुरोहित येणार असून गुरूजींच्या माध्यमातून मंत्रोच्चार अर्शिवाद देणार आहे. त्यासाठी मनसेकडून पोस्टर छापण्यात आले आहेत. या पोस्टरवर हिंदूजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे. यांना शुभार्शीवाद देण्यासाठी शेकडो गुरूजन अशाप्रकारचा मजकूर छापण्यात आला आहे. आणि यावर पत्ता आणि वेळही नोंद केली आहे. धार्मिक विधी पार पडल्यावर राज ठाकरे लगेच औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांच्याबरोबर मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते असणार आहेत.
सभास्थळावरील तयारीचा घेतला आढावा
औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेच्या नियोजनात कोणतीही काटकसर राहू नये, यासाठी स्वत: अमित ठाकरे हे आढावा घेण्यासाठी सभास्थळी पोहोचले. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तयारीवर मी खूश आहे, असं यावेळी अमित ठाकरे म्हणाले.
दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राज ठाकरे या सभेतही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.