'उद्धव ठाकरेंनी पाठीत सुरा खुपसला, आता जमिन दाखवण्याची वेळ आलीयं'
मुंबई : शिवसेनेने आपल्याला धोका दिला. यामुळेच आता उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर सोडले आहे. तसेच, शिंदे सरकार हीच खरी शिवसेना आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. ते आज मुंबई दौऱ्यांवर असून आगामी पालिका निवडणुकींसाठी त्यांनी रणशिंग फुंकले आहे.
अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. 2014 साली दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. राजकारणात जो धोका सहन करतो, तो कधीच मजबूत होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुपसला. जनमताचा अपमान केला हे मुद्दे सांगण्यासाठी आता संकोच नको. कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र, आपल्या घरासमोर कानाखाली मारली. तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो. आता उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवण्याची वेळ आली आहे. शिंदे सरकार हीच खरी शिवसेना आहे, अशा शब्दांत त्यांनी उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले असून कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरली आहे.
तुम्ही यंत्रणाच्या खूप वर पोहोचला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भाजपाने विस्तार केला आहे. तांत्रिक दृष्ट्या मी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. भाजपाच्या समर्थनार्थ प्रत्येक कार्यकर्त्याला मैदानात उतरणं गरजेच आहे. तुम्ही १३५ चे टार्गेट ठेवले आहे. मी १५० नगरसेवक बोलत आहे. मुंबई महापालिकेवर पुढचा महापौर भाजपचाच, असेही अमित शहा यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असून लालबागचा राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार उपस्थित होते. यादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.