Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाबाबत संदिग्धता कायम; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाबाबत संदिग्धता कायम; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग तूर्त बाजूला ठेवण्याची भूमिका घेत या महामार्गाचे भूसंपादन रद्द करण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू असतानाच केवळ कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यांचा अपवाद वगळता या महामार्गाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा विरोध दूर करण्याचे आणि गरज वाटल्यास महामार्गाच्या आरेखनात सुधारणा करण्याचे आदेश रस्ते विकास महामंडळास दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकभावना लक्षात घेता महामार्गासंदर्भात निर्णय घेऊ, कुठलाही प्रकल्प लादला जाणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

याबाबतीत जनभावना जी आहे ती लक्षात घेऊन सरकार यावर निर्णय घेईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर आम्ही थोपणार नाही, लादणार नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळे जनतेनी काळजी करण्याची आवश्यकता नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com