गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला दानवेंचे प्रतिआव्हान; शिंदे गटाच्या सभा होतील, मग तुम्ही बघाच
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होत आहे. परंतु, त्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुलाबराव पाटलांनी ही सभा उधळण्याचा इशारा दिलेला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे शिवसेनेची सभा ही विराट होईल. शिंदे गटाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली तसेच खोट्या दंडामध्ये बेडक्या भरवल्या जातात. या सभेवर त्याचा परिणाम कुठलाही होणार नाही. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सभेला येतील. आव्हान परतून लावणं हे शिवसेनेला अवघड नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
निवडणुका नसताना या सभा फक्त विचार व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या सभा या ठिकाणी होत आहेत. शिवसेनेच्या सभेला जर कोणी आडवं जात असेल तर त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल. गुलाबराव पाटलांवर टीका करताना दानवे म्हणाले, ज्या गावच्या बाबही त्याच गावच्या बोरी देखील असतात. शिंदे गटाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना विनंती व आव्हान देखील केले आहे. सभा आहे शांत बसून ऐका जर पटत नसेल तर कानात बोळे घाला. आगामी काळात शिंदे गटाच्याही सभा होतील मग तेव्हा काय होईल याचा परिणाम मग तुम्ही बघा, असा देखील इशारा दिला.
भ्रष्टाचाराच्या गंगेने खोक्याचे हात भरलेले आहेत त्यांनी दगडाची भाषा करू नये. गुलाबराव पाटलांना जर टीका सहन होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा संजय राऊत देखील राजीनामा देतील आणि निवडणुकीला सामोरे जाऊ. घुसण्याची भाषा आमच्याशी करू नये घुसले तर तिथेच बंदोबस्त करू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला..
दरम्यान, संजय राऊत यांनीही गुलाबराव पाटलांवर टीका केली होती. जळगावमध्ये एक गुलाबो गँग आहे. ज्यांनी 50 कोटी घेतले व विकले गेले. सुवर्ण नगरी आहे ते काही दिवस आमच्यात सोन म्हणून वावरत होते मात्र ते कोळसा निघाले. आजच्या सभेत त्यांचा भांडाफोड करू. सगळ प्रकरण आता बाहेर काढणार, असे त्यांनी म्हंटले आहे.