अतुल भातखळकरांचा थेट सुप्रीम कोर्टाच्या विधानावरच टीका; दानवेंनी सुनावलं

अतुल भातखळकरांचा थेट सुप्रीम कोर्टाच्या विधानावरच टीका; दानवेंनी सुनावलं

मणिपूरमधील व्हिडिओने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात येत आहेत. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे
Published on

मुंबई : मणिपूरमधील व्हिडिओने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात येत आहेत. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सरकारवर ताशेरे ओढले होते. न्यायालयाच्या विधानावर थेट भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. यावरुन अंबादास दानवेंनी भातखळकरांना चांगलेच सुनावले आहे.

अतुल भातखळकरांचा थेट सुप्रीम कोर्टाच्या विधानावरच टीका; दानवेंनी सुनावलं
Manipur Violence: व्हायरल व्हिडीओनंतर संतप्त महिलांनी जाळले मुख्य आरोपीचे घर

काय म्हणाले होते सर्वोच्च न्यायालय?

मणिपूरमधील घटना अजिबात मान्य करता येणार नाहीत. हे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे. मणिपूर घटनेप्रकरणी कारवाई करण्यास आम्ही सरकारला थोडा वेळ देऊ. अन्यथा आम्हीच पावले उचलू, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला इशारा दिला होता.

अतुल भातखळकरांचा सवाल

अतुल भातखळकर यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या विधानालाच प्रत्युत्तर दिले आहे. सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुका आणि संसद, असा सवाल भातखळकरांनी विचारला आहे. तसेच, खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

अंबादास दानवेंनी सुनावले

तुम्ही कोण, तुमची पात्रता काय आणि थेट सर्वोच्च न्यायालयावर बोलत आहात. पण, पोटातले ओठावर आले तुमच्या कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? हेच तर हवयं ना महाशक्तीला, असा निशाणा अंबादास दानवेंनी भातखळकरांवर साधला आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीचं घर मणिपूरमधील संतप्त महिलांना जाळले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com