Ambadas Danve : 'पहाटेचा शपथविधी लक्षात ठेवा, बाकी विजय आपलाच'

Ambadas Danve : 'पहाटेचा शपथविधी लक्षात ठेवा, बाकी विजय आपलाच'

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करण्यात येईल. 23 ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज करता येणार असून 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी करण्यात येईल त्यानंतर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच अंबादास दानवे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, हा फोटो आठवतोय ना? या पहाटेच्या शपथविधीची तारीख होती २३ नोव्हेंबर २०१९. आता २३ नोव्हेंबर २०२४ रोजीच महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडी यांचा निकाल लावणार आहे!

यासोबतच ते पुढे म्हणाले की, काळे जॅकेट आणि पांढरा शर्ट घातलेले या फोटोतील नेते आता गेले दोन वर्षांतील घटनाबाह्य सरकारच्या काळातील जंत्री आपल्यापुढे वाचतील. मात्र यांनी पाच वर्षांपूर्वी केलेला हा पहाटेचा शपथविधी फक्त लक्षात ठेवावा.. बाकी विजय आपलाच आहे. असे अंबादास दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com