गृह विभागाच्या 'त्या' निर्णयाला अंबादास दानवेंचा कडाडून विरोध; म्हणाले, हा निर्णय चुकीचाच

गृह विभागाच्या 'त्या' निर्णयाला अंबादास दानवेंचा कडाडून विरोध; म्हणाले, हा निर्णय चुकीचाच

राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
Published on

मुंबई : राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत २८९ अन्वये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात प्रखर विरोध दर्शविला आहे.

गृह विभागाच्या 'त्या' निर्णयाला अंबादास दानवेंचा कडाडून विरोध; म्हणाले, हा निर्णय चुकीचाच
मध्यान्ह योजनेचे लाभार्थी खोटे, कोट्यवधी रुपये कुठे गेले; अंधारेंचा सरकारला प्रश्न

गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीत सहायक शिपाई ते सहायक निरीक्षक अशी ४० हजार ६२३ पदे मंजूर करण्यात आलेली असल्याची माहिती दानवे यांनी परिषद सभागृहात दिली.

एकीकडे केंद्र सरकार २ कोटी रोजगार देण्याची घोषणा करते. तर दुसरीकडे ९ खासगी संस्थाना वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार देण्यासाठी नेमणूक सरकारने केली आहे. जगात स्कॉटलंड यार्ड धर्तीवर मुंबई पोलिसांची ओळख आहे. असे असताना कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलेला निर्णय हा चुकीचा असून पोलीस हे सरकारी अखत्यारीतच असले पाहिजे, अशी भूमिका मांडत अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलीस भरतीला कडाडून विरोध दर्शविला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com