सोमय्यांना का सहन करते? भाजप तोंड का उघडत नाही; दानवेंचा सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचे पडसाद अधिवेशनातही उमटले असून अंबादास दानवे आक्रमक झाले आहेत.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचे पडसाद अधिवेशनातही उमटले असून अंबादास दानवे आक्रमक झाले आहेत. अंबादास दानवेंनी सोमय्यांवरुन भाजपला लक्ष्य केले आहे. त्यांचे एवढं व्हिडीओ बाहेर आलं तरी भाजप या किरीट सोमय्यांना का सहन करते? सोमय्यांवर भाजप तोंड का उघडत नाही, असा सवाल त्यांनी विचारले आहेत.

सुजीत पाटकारांच्या अटकेबाबत अंबादास दानवेंनी विचारले असता त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शरसंधान साधले आहे. ते म्हणाले की, अटक झाल्याने काय होणार आहे. राऊतांनाही अटक झाली होती. न्यायालयाने काय मत नोंदवलं. जाणीवपूर्वक ईडीचा वापर केला जात आहे. सुजीत पाटकरांना अटक झाली. राऊतांना अटक केली व ते सुटले. मला तर वाटतं ही बदल्याची भावना भाजपा राज्य आणि केंद्राची आहे. याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार आहे, अशी टीका त्यांनी केली.

तसेच, तक्रार करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर भाजपाने कारवाई करावी. त्यांचे एवढं व्हिडीओ बाहेर आलं तरी भाजप या किरीट सोमय्यांना का सहन करतेयं? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. सोमय्यांवर भाजप तोंड का उघडत नाही? भाजपने तोंड उघडलं पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे. सोमय्या यांच्यासारखी प्रवृत्ती ईडीच्या दारावर बसलेली असते. ईडी त्यांच्याया इशाऱ्यावर नाचते. या सोमय्यांचे व्हिडीओ आलेत. ते कुठलेत बोलायला लावू नका. बाहेर काढायला लावू नका. भाजपने सोमय्यांवर कारवाई केलीच पाहिजे. सोमय्या समाजाच्या बाबतीत अविश्वासर्ह आहे, यामुळे त्यांच्या तक्रारीत कोणता अर्थ राहणारं हा माझा प्रश्न आहे, असा निशाणाही दानवेंनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com