सोमैय्यांच्या व्हिडिओचं काय झाले ते आधी सांगावं; दानवेंचा भाजपला टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी गंभीर आरोप केला आहे. यावरुन अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर, अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. किरीट सोमैय्या आणि प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडिओचं काय झाले ते आधी सांगावं, असे म्हणत दानवेंनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

सुर्वे व सोमय्यांचा व्हिडिओ आला त्याचे काय झाले ते आधी सांगावं. त्यांनी राहुल गांधी याबाबत शिकवण्याचे गरज नाही. नितेश राणे चिल्ल्लर त्यांच्यावर कोण बोलणार, असा टोला नितेश राणेंनाही अंबादास दानवेंनी लगावला आहे.

प्रकाश सुर्वेच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. मला काल फोन आलं होता तेव्हा याबाबत माहिती देण्यात आली. एका व्यावसायिकाला अपहरण करण्यात आले. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. घटना संपत असताना पुन्हा मारहाण केली हे म्हणजे सत्तेचा माज आहे. त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना पण मारले होते. भाजपचे सरकार असून सुद्धा ते मार खात आहेत. कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे हे सरकारचे लोकच काढत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com