पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राऐवजी आता गुजरातला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, केंद्रातील सूक्ष्ममंत्री...

पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राऐवजी आता गुजरातला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, केंद्रातील सूक्ष्ममंत्री...

सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. यावरुन आता विरोधकांनी आता सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
Published on

मुंबई : सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरुन आता विरोधकांनी आता सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राऐवजी आता गुजरातला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, केंद्रातील सूक्ष्ममंत्री...
ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई; 96 जण ताब्यात

अंबादास दानवे म्हणाले की, तयारी राज्याने करायची आणि प्रकल्प गुजरातने न्यायचं आणि जे लोक आहेत राणे, सामंत, केसरकर यांनी फक्त आमच्यावर टीका करायची कामं आहे. यांचा बुडाखालचा पाणबुडी प्रकल्प गेला हे आपल्या दृष्टीने हितवाह नाही. रिफायनरी नेणार नाही, फक्त ज्यातून फायदा ते नेतात. हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहील. कारण गुजरातच्या लोकांसमोर आपल्या नेत्यांची तोंड उघडत नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तिथं केंद्रातील सूक्ष्ममंत्री आहेत, राज्याचे उदयोग मंत्री आहेत तरी इतका चांगला प्रकल्प गेला आहे, असा निशाणाही त्यांनी नारायण राणेंवर साधला.

दरम्यान, महास्वच्छता अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावरुन अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. आगामी निवडणुकीत तुमचं जनता करेल, तुमचं क्लीन ठरलं आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com