राजकारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द; तातडीची बोलावली बैठक
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत.
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यामुळे आता शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी आत आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे.
त्यामुळे आजच्या बैठकीत महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.