शिर्डी नगरपंचायत निवडणूकीवर सर्वपक्षीय ग्रामस्थांचा “बहिष्कार”
कुणाल जमदाडे | शिर्डी | राज्यात सार्वत्रिक नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, लोकसंख्येच्या आधारे शिर्डी नगरपंचायतीची नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी शिर्डीकरांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आज 1 डिसेंबर पासून निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली असून सर्व पक्षीय बहिष्कार टाकण्यात आला आहे.
शिर्डी नगरपरिषद व्हावी यासाठी यापुर्वी दाखल केलेल्या याचीकेची सुनावणी येत्या 7 डिसेंबर रोजी होणार असुन नेमकी शिर्डी नगरपंचायतच्या 2021 सार्वत्रीक निवडणूकी साठीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारख 7 डिसेंबर पर्यंत असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे नगरपंचायती निवडणुकीवर बहीष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावं यासाठी दाखल असलेल्या याचिकेवर सात डिसेंबरला महत्वपूर्ण सुनावणी असल्याने कदाचित नगरपरिषदेबाबतचे आदेश झाल्यास पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये , या भीतीने बहिष्काराचा पर्याय समोर आलाय.