माझ्या देखतच मुलानं मुख्यमंत्री व्हावं; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

माझ्या देखतच मुलानं मुख्यमंत्री व्हावं; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Published on

बारामती : बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी या गावची सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान आज पार पडत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

माझ्या देखतच मुलानं मुख्यमंत्री व्हावं; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा
इगतपुरीत ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट; दोन महिला उमेदवारांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आशताई पवार म्हणाल्या की, अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशाताई पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. तर 2950 सदस्य निवडीसाठीही पोटनिवडणूक होत आहे. 2489 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. तसेच, 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीही मतदान होत आहे. तर 6 नोव्हेंबरला म्हणजेच उद्याच मतमोजणी पार पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com