राजकारण
वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत नेणार असल्याचं अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे. विरार अलिबाग मल्टीकॉरिडोर, जालना नांदेड करता भूसंपादनास निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
सागरी भागात 9 पैकी 9 पुलास मान्यता दिली आहे. राज्यात 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात दळणवळण अधिक भक्कम करण्यासाठी 10 हजार किमी व्यतिरिक्त 7 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेणार आहे. एलिफंटा येथे बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येत आहे.