50 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते यात काहीतरी काळंबेरं – अजित पवार

50 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते यात काहीतरी काळंबेरं – अजित पवार

तिसावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली शिवसैनिक सारखं का सांगावं लागत? याचे आत्मचिंतन झालं पाहिजे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच 50 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते यात काहीतरी काळंबेरं अशी शंका भाजपा शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहातील भाषणादरम्यान अजित पवारांनी व्यक्त केली.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केले, त्यावेळी तिसावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली शिवसैनिक सारखं का सांगावं लागत? याचे आत्मचिंतन झालं पाहिजे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच 50 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते यात काहीतरी काळंबेरं अशी शंका भाजपा शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहातील भाषणादरम्यान अजित पवारांनी व्यक्त केली.

50 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते यात काहीतरी काळंबेरं – अजित पवार
'शिंदेशाही'वर विधानसभेत शिक्कामोर्तब;भाजप-शिंदे गटाचा बहुमताचा आकडा पार

अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ३० जून शपथ घेतली आज वेगळी भूमिका आहे. लोकशाहीत हे चालत. सत्ता येते जाते. देवेंद्रजी कळलं नाही एकनाथ राव समर्थन करत होता. मग एकनाथ राव शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा रस्ते विकास खात का दिल? नेता मोठ असला की खात मोठ देतात जर आजचे मुख्यमंत्री एकनाथ राव तेवढे गुण होते तर फक्त एक छोटे रस्ते विकास महामंडळ जनतेशी सबंध नव्हता. जनतेशी सबंधित एखादे खाते त्यांना दिले नाही त्यामुळे महाराष्ट्र विचार करेल असेही अजित पवार म्हणाले.

50 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते यात काहीतरी काळंबेरं – अजित पवार
Devendra Fadnavis : 'मी पुन्हा येईल'ची ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार

11 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे ते निर्णय देतील मग तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घ्यायचे कारण होते का? असा प्रश्नदेखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थिते केला. यावेळी अजित पवारांनी राज्यपाल आयुक्त आमदारांच्या निवडीवरूनही हल्लाबोल केला.

ते म्हणाले की, आम्ही 12 आमदारांच्या निवडीबाबत अनेकदा राज्यपालांना भेटलो परंतु, त्यावर आता जेवढा त्वरीत निर्णय घेण्यात आला तेवढा झटपच निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, आता राज्यपाल अॅक्शन मोडवर आले आहेत. पटोलेंनी राजीनामा दिला त्यानंतर सव्वा वर्ष निवडणूक घेतली नाही. तारीख द्या सांगितल अध्यक्ष निवड लावली नाहीत असे झाले नाही. आता मात्र लगेच निवड लावली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com