राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी स्थिती नाही; अब्दुल सत्तार
Abdul Sattar : शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी केलं पत्रकार परिषदेत भाष्य केलं. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अशा शब्दांत पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले. मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं, अशी मागणीही यावेळी अजित पवारांनी केली. (Ajit Pawar slams Maharashtra due to govt Abdul Sattar)
दरम्यान, अब्दुल सत्तार हे आता कृषिमंत्री असणार आहे. खातेवाटपानंतर त्यांनी मंगळवारी प्रथमच कृषी विभागाचा आढावा घेतला. राज्यातील नुकसानीचे क्षेत्र आणि प्रत्यक्ष किती क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे याचा त्यांनी आढावा घेतला आहे. पण राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी स्थिती नाही. शिवाय त्यासाठी काही नियम अटी ह्या ठरवून दिलेल्या असल्याचे त्यांनी आढावा बैठकीतच सांगितले होते. पण आता विरोधकांकडून मागणीचा जोर वाढला तर काय हे आधिवेशनातच पहावे लागणार आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येची संख्या अधिक असल्याने आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्यावर ही वेळ का येत आहेत याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याच सत्तार म्हणाले. सोबतच जमिनी कशा आहेत, त्यातून शेतकरी काय पिकवत आहे. त्याने काय पिकवले पाहिजे या सर्व गोष्टी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन यावर काही निर्णय घेता येतील का याचा विचार केला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले.