नाराजीच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले, काहीही फालतू...

नाराजीच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले, काहीही फालतू...

विरोधी पक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून राजकारणातून गायब होते. शिर्डीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरातून अचानक नॉट रिचेबल झाले.
Published on

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून राजकारणातून गायब होते. शिर्डीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरातून अचानक नॉट रिचेबल झाले. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज अनेक दिवसांनी ते माध्यमांसमोर आले असून चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.

नाराजीच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले, काहीही फालतू...
...अन् राहुल गांधींनी दिले त्याच्या स्वप्नांना पंख! चिमुकल्याला संगणक दिला भेट

मावळातील तळेगांव दाभाडे येथे टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर कार्यक्रमात अजित पवारांनी आज हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले की, काहीही बातम्या देतात. काहीही फालतू बातम्या देतात, असे म्हणत त्यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबरला मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री आलो. थकलो होतो. पण, आजही आलो नसतो तर वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या, असा टोला त्यांनी लगावला आहे. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? मी नाराज असल्याच्या अफवा आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहेत.

नाराजीच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले, काहीही फालतू...
अफजल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा; उदयनराजेंची शिंदे सरकारकडे मागणी

दरम्यान, शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी भाषण केले. परंतु, त्यानंतर ते शिर्डीतून निघून गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णालयातून थेट शिबीराला हजेरी लावली होती. पण, अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर होते. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com