अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. मागील 32 वर्षांपासून अजित पवार या बॅंकेचा संचालक म्हणून कारभार पाहात होते. परंतु, अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
1991 पासून अजित पवार पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी होते. परंतु, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदाचा व्याप वाढल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय पक्षाची वाढती जबाबदारी म्हणून राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची माहिती दिली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारमध्ये 100 दिवस पूर्ण झाल्याने जनतेसाठी पत्र लिहिलं आहे. या पत्रात अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याची भूमिका मांडली आहे. तसेच या पत्रात अजित पवार यांनी स्वत:चा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे.