सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या 'त्या' विधानावर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. या सभेतून बोलताना सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसे करायचे असते, संस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, विरोधकांबद्दल बोलत असताना कशी पातळी सोडायची नसते. काही आरोप - प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची काही पद्धत असते हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलं. तीच पद्धत पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवार साहेब, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी तीच पद्धत पुढे त्याठिकाणी चालू ठेवली.
हे जे काल काही वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्थ आहे. त्याचा तीव्र शब्दामध्ये मी कालच निषेध केला. नुसतं तेवढ्यावर थांबलो नाही मी त्यांना फोन केला. त्यांना म्हटले की, अजिबात तुमचं केलेलं वक्तव्य आम्हाला कुणाला आवडलं नाही आहे. हे तुम्ही बंद करा अशा पद्धतीने वैयक्तिक कुणाच्याबद्दल बोलणं ही आपली पद्धत नाहीच आहे. त्याबद्दलचा आम्ही निषेध केलेला आहे. फक्त पवार साहेंबाबद्दल तर
यासोबतच ते पुढे म्हणाले की, हे असं पुन्हा घडताच कामा नये. पण इथून पुढे महाराष्ट्रामध्ये अनेक नेते, मंडळी येतील. अनेक राजकीय पक्षाचे वक्ते येतील, अनेक राष्ट्रीय नेते येतील कुणीच कुणाच्याबद्दल बोललं नाही पाहिजे. तुम्हाला काही भूमिका मांडायची आहे ती मांडा ना. तुमची विचारधारा इतरांची विचारधारा वेगवेगळी असू शकते. मतमतांतर असू शकते. परंतु ते मतमतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे. अतिशय निंदणीय प्रकार आहे. असे अजित पवार म्हणाले.