छगन भुजबळ यांच्या संदर्भातील 'त्या' दाव्यांवर अजितदादांची प्रतिक्रिया, म्हणाले...
'2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपबरोबर गेलो. ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच झाला" असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा या पुस्तकातून दावा करण्यात आला आहे.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, भुजबळ साहेबांनी स्वत: सांगितले मुलाखत दिलेली नाही. ज्यांनी छापली त्यांच्याविरोधात मी कोर्टात पण जाणार आहे, दावाही करणार आहे असं स्वत: सांगितले. काय होतं अलिकडे निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येतो आहे तसे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेऊन काहीतरी नवीनच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे.
वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दा ही नाही. स्वत: भुजबळ साहेब तसं काही बोललेलं नाही. आज एक ते जबाबदार नेते आहेत. आमचे महायुतीचं वरिष्ठ पातळीवरुन सगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. त्यांचे ही फिरत आहेत. महत्वाचा मुद्दा तो म्हणजे निवडणुकीचा आहे आणि त्यांनी स्वत:च सांगितले आहे. असे अजित पवार म्हणाले.