अजित पवारांचा राष्ट्रवादीवर दावा; घड्याळ चिन्हावरचं लढणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीवर दावा; घड्याळ चिन्हावरचं लढणार

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून सर्वच स्तरावरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Published on

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून सर्वच स्तरावरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशातच, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत कारण सांगितले आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. विरोधी पक्ष पदाचा शुक्रवारीच राजीनामा दिला होता, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

अजित पवारांचा राष्ट्रवादीवर दावा; घड्याळ चिन्हावरचं लढणार
महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील झाला ‘दिगू टिपणीस’; राज ठाकरेंचा निशाणा

आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी म्हणून सामील झालो आहे. सध्या देश पातळीवर जी परिस्थिती आहे यात विकासाला महत्त्व दिलं पाहिजे. देशाला पुढे नेहमीचे प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत. सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा विरोधी पक्षांची बैठक होत होती त्यातून काहीच आऊट पुट येत नव्हतं. आजपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार काम करत होते. माझी भूमिका वर्धपणा दिनानिमित्त मांडली. येथून पुढे तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय निधी महाराष्ट्राला मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी पक्ष माझ्यासोबत, पक्ष आणि चिन्ह माझ्याकडेच असून येणाऱ्या निवडणूका आम्ही राष्ट्रवादीकडूनच लढणार आहोत. आम्ही वास्तविक साडेतीन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता त्याहीवेळेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार होतं. आम्ही सगळ्यांनी काम केलं. त्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार, आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो, असंही पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com