Pawar Vs Pawar : रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवार म्हणाले...

Pawar Vs Pawar : रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवार म्हणाले...

कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी MIDCच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन केले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी MIDCच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन केले. विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आंदोलनासाठी बसले आहेत. आमदार जयंत पाटील यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला तिथे गेले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज विरोधकांनी दिवसाच्या सुरूवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, रोहित पवार यांनी तिथं आंदोलन किंवा उपोषण करू नये. तसेच आपलं म्हणणं, सभागृहात येऊन मांडावे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. तेथील पावित्र्य राखलं पाहिजे. तिथं आंदोलन किंवा उपोषण करायचं नाही, हे ठरलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. उद्योगमंत्री पत्र देतात. अजून अधिवेशन संपलेलं नाही. अधिवेशन सुरू होऊन एकच आठवडा झालेला आहे. आजच दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. लोकप्रतिनिधींनीही निवेदन दिल्यानंतर एमआयडीसीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारे उपोषणाला बसणे उचित नाही. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com