मुंबईकडे आतापर्यंत राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले; अजित पवारांचे विधान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा झाली आहे. याची घोषणा खासदार सुनील तटकरे यांनी केली. मुंबईमध्ये जेवढा पक्ष मोठा करायला पाहिजे होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला नाही याची खंत आहे, असे अजित पवारांनी यावेळी म्हंटले आहेत.
समीर भुजबळ जी जबाबदारी दिली आहे ती योग्य पद्धतीने पार पाडतील अशी अपेक्षा आहे. मी जेव्हा तरुण कार्यकर्ता होतो त्यावेळी लीडच काम छगन भुजबळ पाहत होते. स्टेजच्या मागची जबाबदारी समीर भुजबळ पार पडायचे. पहिल्याच निवडणुकीमध्ये आपण सत्तेमध्ये राहण्याचे काम कार्यकर्त्यांच्या जीवावर केलं. आपल्याला पंचवीस वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होतील, असे अजित पवार म्हणाले आहेत.
मुंबई म्हणजे मिनी इंडिया. मुंबईमध्ये आणि जाती-धर्माचे अनेक देशातले अनेक राज्यातले लोक राहतात. मुंबई सतत चालत असते, पळत असते. संकट आली तर त्यावर सावरून परत मुंबई सुरळीत चालते. मुंबईमध्ये जेवढा पक्ष मोठा करायला पाहिजे होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला नाही याची खंत आहे, असे त्यांनी बोलून दाखविले.
मुंबईमध्ये राष्ट्रवादीला मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गाला एकजूट करण्याचं काम समीर तुम्ही कराव ही अशी अपेक्षा करतो. राष्ट्रवादी काँग्रेस एक नवीन भरारी घेईल अशी अपेक्षा करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या समस्याला धावून येतो त्यावेळेस तुम्हाला नक्कीच मतदार साथ सोडणार नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार सोडलेलं नाही, असे स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
आपल्या कामातून जनतेचा राज्याचं भलं व्हावं. महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर राहिला पाहिजे. सत्ताही असली पाहिजे. राज्याला देशाला योग्य ते सरकार पाहिजे. युती आघाडी असले पाहिजे. वंचित समाजाला कुठेही दगा फटका होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस जातीधर्माला घेऊन समोर जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पुढे असेल असा विश्वास व्यक्त करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.