राष्ट्रवादी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार? अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार? अजित पवार म्हणाले...

मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे.
Published on

पुणे : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. यामुळे विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी दावा करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही यावर विचार करू, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार? अजित पवार म्हणाले...
मनिषा कायंदेंचा शिंदे गटात प्रवेश; राऊत म्हणाले, चाळीस कोटीची फाईल...

राष्ट्रवादीची आमदारांची बैठक आधीच ठरलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील घडामोडींचा याच्याशी काहीही संबंध नाही. विरोधी पक्ष नेतेपदाचाही कोणताही संबंध नाही. महाविकास आघाडी आहे. उगीच काही बातमी चालवू नका, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

विधीमंडळात ज्या विरोधकांकडे अधिक संख्या असते त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. तुम्ही जे सांगताय त्याबद्दल आम्ही कोणता विचार केलेला नाही. मात्र, तुम्ही ही गोष्ट लक्षात दिलीय त्यानंतर विचार करु. महाविकास आघाडीबाबातचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी घेतात. मी याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारेन, असेही त्यांनी म्हंटले आहे.

बीआरएस महाराष्ट्रात प्रयत्न करतायत. कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाची वाढ करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आणि भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र लढणार असं चित्र आहे. त्यामुळे अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळणार नाही असं वाटतय त्यामुळे अनेकजण बीआरएसमध्ये जात आहेत. बीआरएसच्या जाहिरातीसाठी पैसा कुठुन येतोय, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे. अशीच जाहिरातबाजी शिंदे-फडणवीस सराकरची सुरु असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, विधान परिषदेत ठाकरे गटकडे 10 आमदार होते. यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु, मनिषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. आता विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी 9 आमदार आहेत. तर, शिंदे गटाकडे 10 आमदार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com