एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे मिस्टर...; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे मिस्टर...; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. भाजपा
Published on

मुंबई : सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. भाजपा पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असे अजित पवार यांनी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे.

एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे मिस्टर...; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
सत्तेचा गैरवापर; शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, ...तरी ईडी मागे लावतो म्हणून धमकी

महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल हा अचानक घडलेला नव्हता. अनेकदा एकनाथ शिंदेबाबत कानावर यायचं. हे उध्दव ठाकरे आणि शरद पवारांना सांगितले होते. ठाकरे सरकार आल्यानंतर पहिल्या दिवसांपासून भाजपने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न करत असताना एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे मिस्टर अनेकदा वेशभूषा बदलून रात्रीचे बाहेर जायचे.

त्या धर्मपत्नीलाही माहित नव्हतं की चांगल्या कामासाठी जात आहेत की इतर कुठल्या कामाला जात आहेत. कारण वेशभूषा रात्री बदलून बायकोला घरी ठेवून पुरुष बाहेर पडतो त्यात दोन-तीन अर्थ निघू शकतात. मात्र नंतर समजलं की हे कशासाठी बाहेर जात होते. एकनाथ शिंदे आणि संबंधित व्यक्ती भेटी घेत होते. हे त्यांच्याच सहकाऱ्यांनी सांगितलं, असा टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी विश्वासाने अधिकारी ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना दिला होता. एकनाथ शिंदे हे २० जूनला बाहेर पडले त्यांवेळी त्यांच्याच अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षितपणे सुरतला पोहचवलं. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्या कार मातोश्रीवर वळवा. पण एकनाथ शिंदेंना ते अधिकारी लॉयल राहिले आणि सगळं नाट्य घडलं, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com