बारसुवरुन ठाकरे गटामध्येच वेगवेगळं मतप्रवाह; अजित पवारांचे मोठे विधान, विकासला विरोध नाही परंतु...
मुंबई : कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन चिघळले असून पोलिसांनी आज आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमचा विकासला विरोध नाही. परंतु, पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. शहानिशा करुन निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हंटले आहे.
बारसू रिफायनरीला उद्धव ठाकरे गटातील एक आमदार याला समर्थन करत आहे. तर खासदार विरोध करत आहे. साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार राहिले आहेत ते म्हणतात माझा पाठिंबा आहे. या सगळ्यांचा विचार करुन याबाबत निर्णय घ्यावा. आमचा विकासला विरोध नाही. परंतु, पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. शहानिशा करुन निर्णय घ्यावा. ज्याच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत.
आंदोलनात स्थानिक कमी बाहेरची लोक जास्त आहेत, असं बोलत आहेत. उदय सामंत यांचा प्रयत्न सुरु आहे, असं दिसत आहे. उदय सामंत यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं की तिथल्या लोकांचा कुठल्या गोष्टीला विरोध आहे हे विचारायला हवं. तिथल्या लोकांचे व्यवसाय अडचणीत येऊ शकतो म्हणून हा विरोध आहे का? इतर कारण आहेत हे पाहायला हवं. लाखो लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. परिसराचे कायमचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मी जनतेसोबत असल्याचे म्हंटले आहे. तर, राष्ट्रवादीची भूमिका विकासाबाबत नेहमी सकारात्मक राहिली आहे. अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले आपण पाहिले. पण, यातून जर रोजगार येऊन आणि तिथे वातावरण आणि निसर्गाला बाधा येणार नसेल तर विचार करायला हवा. स्वतः उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तिथल्या नागरिकांचं शंकाच निरसन करावं, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
दरम्यान, बारसूला जाणार का? असे अजित पवारांनी विचारले असता बारसूला जाण्याचं मी अजून ठरवलं नाही, पणं गरज पडली तर जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.