...तेच आयोजकांचे चुकले; 11 श्री सदस्यांचा मृत्यू, अजित पवारांनी सांगितले कारण

...तेच आयोजकांचे चुकले; 11 श्री सदस्यांचा मृत्यू, अजित पवारांनी सांगितले कारण

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. येथे उपस्थित अकरा श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.
Published on

मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. येथे उपस्थित अकरा श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णांची भेट विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उध्दव ठाकरे यांनी रुग्णालयात घेतली. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

...तेच आयोजकांचे चुकले; 11 श्री सदस्यांचा मृत्यू, अजित पवारांनी सांगितले कारण
उष्माघातामुळे 11 श्री सदस्यांचा झाला मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत घोषित

हलगर्जीपणा झाल्यावरती काय घडू शकते हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं. किती मृत्युमुखी झालेत हे अजून काळात नाहीत. आम्हाला कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कोणताही आकडा लपवायचा नाही. कार्यक्रम संपल्यानंतर थोडी गर्दी झाली आणि त्यात चेंगराचेंगारी झाली असे काही सांगतायत, असेही अजित पवारांनी सांगितले.

उन्हाळा भरपूर आहे आणि अशातच कार्यक्रमाची वेळ दुपारी निवडणे हे आयोजकांचा चुकलेला आहे. का घडलं, कोणी हलगर्जीपणा दाखवला कोणी दुर्लक्ष केले या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत, आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण, 14 कोटींचा बजेट होत, एवढी रक्कम खर्च केली सरकारणे तर अशा घटना घडायला नको होत्या, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित 11 श्री सदस्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. तसेच, रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com